स्मृती इराणी यांनी मुंबईत राष्ट्रीय पोषण अभियान मोहिमेचा शुभारंभ

 

मुंबई (वृत्तसंस्था) : महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी आज सकाळी मुंबईत राष्ट्रीय पोषण अभियान मोहिमेचा शुभारंभ केला. धारावीत झालेल्या या कार्यक्रमात इराणी यांच्या हस्ते मुलांना आणि गर्भवती मातांना फळांचं वाटप करण्यात आलं.

दरम्यान इराणी यांनी गर्भवती आणि स्तनदा मातांशी संवाद साधला तेंव्हा गर्भवती महिलांना येणाऱ्या अडचणी देखील त्यांनी जाणून घेतल्या. त्यांनी गर्भवती महिलांनी गर्भधारणेच्या कालावधीत जास्तीत जास्त काळजी घ्यायला हवी असा सल्ला दिला.

स्मृती इराणी यांनी अंगणवाडी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना कोविड महामारीच्या काळात त्यांनी केलेलं काम तसंच जनजागृतीसाठी करत असलेल्या कामाचं कौतुक केलं.

लहान मुलांसाठी लसीकरण मोहीम राबवण्याबद्द्ल आणि केंद्र सरकारच्या योजनांबद्दल लोकांना माहिती देण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी केलेलं काम नक्कीच प्रशंसनीय आहे असंही त्या म्हणल्या.