कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत भारतानं ७० कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत भारतानं ७० कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला आहे. काल देशभरात ७८ लाख ४७ हजारापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या. त्यामुळे आतापर्यंत दिलेल्या लसीच्या मात्रांची संख्या ७० कोटी ७५ लाखाच्या वर गेली आहे. देशात काल कोविड १९ चे ३९ हजार ११४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत ३ कोटी २२ लाखापेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनामुक्तीचा दर ९७ पूर्णांक ४८ शतांश टक्के आहे. काल ३७ हजार ८७५ नवे रुग्ण आढळले. देशभरात सध्या सुमारे ३ लाख ९१ हजार एक्टीव्ह रुग्ण आहेत.