टोकियो पॅरालिंपिक्सची सांगता, भारतीय खेळांडूना १९ पदकं

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोकियो पॅरालम्पिक्स स्पर्धांचा काल समारोप झाला. समारोप समारंभात नेमबाज अवनी लेखरा हिनं ध्वज वाहकाचा बहुमान मिळवला. पॅरालिंपिक्समध्ये यंदा १६३ देशांच्या सुमारे साडेचार हजार खेळाडूंनी २२ प्रकारच्या खेळात ५४० स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. पुढील स्पर्धा पॅरीस इथं होणार असून त्या वेळी आणखी मोठी कामगिरी करण्याचा निश्चय करत सर्व स्पर्धक खेळाडूंनी निरोप घेतला. या स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारतानं एकंदर १९ पदाकंची कमाई केली असून त्यात पाच सुवर्ण, आठ रौप्य आणि सहा कास्य पदकांचा समावेश आहे.