पुण्यातील प्रमुख देवस्थानांच्या ठिकाणी कोरोना लसीकरणासाठी विशेष शिबिरांचं आयोजन

 

पुणे : पुणे जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रं आणि प्रमुख देवस्थानं असलेल्या गावांमध्ये कोरोना लसीकरणासाठी विशेष महाआरोग्य शिबिरांचं आयोजन करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीनं घेतला आहे. या निर्णयानुसार ही मंदिरे उघडण्याबाबत राज्य सरकारनं निश्चिकत केलेल्या मुदतीच्या आत या गावांतील नागरिक, पुजारी आणि तीर्थक्षेत्र तसंच देवस्थानशी संबंधित सर्व नागरिकांचं लसीकरण पूर्ण केलं जाणार असल्याचं आरोग्य समितीचे सभापती प्रमोद काकडे यांनी सांगितलं. दरम्यान, मंदिर आणि तीर्थक्षेत्राप्रमाणेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शाळाही येत्या चार आक्टोबरपासून सुरु होत आहेत. आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील सुमारे 90 टक्क्यांहून अधिक शिक्षकांचं कोरोना लसीकरण पूर्ण झालं आहे. उर्वरित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचं लसीकरण प्राधान्यानं करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीनं घेतला आहे.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image
कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ शिवजयंतीचा सोहळा
Image
मेगापॉलिस मेटाव्हर्सच्या मदतीने मुंबईच्या विकासाला अधिक गती – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image