डॉ. दिलीप मालखेडे यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती

  डॉ. दिलीप मालखेडे यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती

मुंबई : पुणे येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे यांत्रिकी अभियांत्रिकी विषयाचे प्राध्यापक असलेल्या डॉ. दिलीप नामदेवराव मालखेडे यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी शनिवारी (दि. 11) डॉ. मालखेडे यांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्ती केली.

डॉ. मालखेडे सध्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद येथे सल्लागार  – 1 या पदावर प्रतिनियुक्तीवर काम करीत आहेत.

माजी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांचा कार्यकाळ दिनांक 1 जून 2021 रोजी संपल्यामुळे हे कुलगुरूपद रिक्त होते.

डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांचेकडे पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.

डॉ. दिलीप मालखेडे (जन्म 27 ऑगस्ट 1966) यांनी अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून बीई  व एमई  प्राप्त केली. त्यांनी आयआयटी  मुंबई येथून पीएच. डी  प्राप्त केली असून त्यांना प्रशासन, संशोधन व अध्यापनाचा व्यापक अनुभव आहे.

कुलगुरू नियुक्तीसाठी राज्यपालांनी प्रो. जगमोहन सिंह राजपुत, निवृत्त महानिदेशक, एनसीईआरटी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठित केली होती. आयआयटी (बनारस हिंदू विद्यापीठ) वाराणसी येथील संचालक प्रमोद कुमार जैन व राज्य शासनाचे प्रधान सचिव ओम प्रकाश गुप्ता समितीचे अन्य सदस्य होते.

समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी प्रो. मालखेडे यांच्या नियुक्तीची घोषणा केली.

Popular posts
नगरसेवक नामदेव ढाके यांच्या तहसिल आपल्या दारी मोफत उपक्रमात नागरिकांना उत्पन्नाच्या दाखल्यांचे वाटप  
Image
कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या देशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य
Image
घरीच कोरोना चाचणी केलेल्या नागरिकांना चाचणीचे निष्कर्ष संबंधित वेबसाइट आणि स्थानिक प्रशासनाला कळविण्याचं राज्य सरकारचं आवाहन
Image
महिला आणि बालविकास विभागाच्या जिल्हास्तरीय विविध कार्यालयांना एकाच छताखाली आणण्याचा निर्णय
Image
लसीकरणाविषयी असलेले गैरसमज दूर करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन
Image