‘बार्टी’च्या महासंचालकपदी धम्मज्योती गजभिये रुजू

  राज्यात ३० मार्चपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहीम

मुंबई :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे च्या महासंचालकपदी धम्मज्योती गजभिये हे सोमवार दि. 20 सप्टेंबर 2021 रोजी रुजू  झाले आहेत. धम्मज्योती गजभिये, हे दि. 27 ऑगस्ट 2021 रोजी वैद्यकीय रजेवर गेल्यामुळे श्री. दि.रा. डिंगळे, सहसचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांनी प्रभारी महासंचालक बार्टी, पुणे या पदाचा कार्यभार स्वीकारला होता.

श्री.धम्मज्योती गजभिये, महासंचालक, (बार्टी), पुणे यांनी सोमवार दि.20 सप्टेंबर 2021 रोजी बार्टी मुख्यालयातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रास पुष्प अर्पण करून अभिवादन करुन महासंचालक बार्टी, पुणे या पदाचा नियमित कार्यभार स्वीकारला. यावेळी बार्टी, संस्थेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.