साहित्य अकादमीचा अनुवादासाठीचा पुरस्कार सोनाली नवांगुळ आणि मंजुषा कुलकर्णी यांना जाहीर

 

मुंबई (वृत्तसंस्था) : साहित्य अकादमीचा अनुवादासाठीचा पुरस्कार सोनाली नवांगुळ आणि मंजुषा कुलकर्णी यांना काल जाहीर झाला आहे. नवांगुळ यांना ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ या अनुवादित कादंबरीसाठी, तर कुलकर्णी यांना ‘प्रकाशवाटा’ या मराठीत पुस्तकाच्या संस्कृत भाषेतल्या प्रकाशमार्गा या अनुवादासाठी जाहीर झाला आहे. रोख पन्नास हजार रुपये, सन्मान चिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.