देशातली कोविड स्थिती आणि कोरोनाप्रतिबंधक लसीकरणाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून उच्चस्तरीय बैठकीत आढावा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत देशातल्या कोरोना स्थितीचा आढावा घेण्यात आला. यामध्ये आरोग्य यंत्रणांची तयारी, ऑक्सीजनची उपलब्धता, त्याची निर्मिती त्याचप्रमाणे कोरोना लसीचे वाटप आदी विषयांवर चर्चा झाली. जगात काही देशांमध्ये त्याचप्रमाणे देशातल्या महाराष्ट्र आणि केरळमध्ये रुग्णांच्या वाढत्या संख्येबाबत या बैठकीत चर्चा झाली. असं असलं तरी आठवड्यातली कोरोनाबाधितांची संख्या सलग दहाव्या आठवड्यातही ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे. रुग्णालयातील खाटांच्या त्याचबरोबर ऑक्सीजनच्या उपलब्धतेवर लक्ष ठेवण्याचे निर्देश यावेळी प्रधानमंत्र्यांनी दिले. देशात ५८ टक्के लोकसंख्येचं लसीकरण केल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी संबंधित यंत्रणेचं कौतुक केलं.