कोविड लसीकरण मोहिमेत भारतानं ७४ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणात भारतानं आज ७४ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला. देशात कालच्या दिवसभरात लसींच्या ६४ लाख ४९ हजाराहून अधिक मात्रा दिल्या गेल्या. देशात १८ ते ४४ या वयोगटात ३३ कोटी ९० लाखाहून अधिक, तर ४५ ते ५९ या वयोगटात २० कोटीहून अधिक आणि ६० वर्षांवरच्या वयोगटात १४ कोटीहून जास्त मात्रा दिल्या असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं कळवलं आहे.