ओबीसी मधील सर्व जातीच्या बांधवांनी एकत्र येऊन लढा द्यावा - विजय वडेट्टीवार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : ओबीसी समाजातील सर्व समाज बांधवानी एकमेकांवर कुरघोडी न करता एकमेकास सहकार्य केलं तरच समाजाचा विकास होऊ शकतो. त्यामुळे ओबीसी मधील सर्व जातीच्या बांधवांनी एकत्र येऊन हा लढा द्यावा असं आवाहन आपत्ती व्यवस्थापन मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बीड इथं केलं. ते ओबीसी हक्क परिषदेत बोलत होते.या हक्क परिषदेला जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.ओबीसींचे आरक्षण परत मिळवण्यासाठी एकमेकांविरुद्ध न लढता मतभेद विसरुन सर्वांनी संघटित व्हावे, असे मत अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. धुळे जिल्हा दौऱ्यावर असताना काल झालेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. लोकशाही टिकवण्याची जबाबदारी सर्वांची असल्याने जातीयवादी शक्तीविरुद्ध एकत्र लढले पाहिजे, असंही भुजबळ म्हणाले.