शेतकरी संघटनेची बुधवारपासून आक्रोश पदयात्रा सुरू

 

मुंबई (वृत्तसंस्था) : पूरबाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा शासन आदेश बदलून 2019 प्रमाणे मदत जाहीर करावी, या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आजपासून प्रयाग चिखली ते नृहसिंहवाडी अशी पंचगंगा परिक्रमा आक्रोश पुरग्रस्तांची पदयात्रा सुरू झाली.

मागण्या मान्य झाल्या नाहीत तर येत्या रविवारी कोल्हापूर जिल्ह्यात नृसिंहवाडी इथं कृष्णा नदीत हजारो शेतकऱ्यांसह जलसमाधी घेण्याचा इशारा शेट्टी यांनी दिला आहे. यावेळी राजू शेट्टी यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.