वर्धा नाव दुर्घटनेच्या शोधमोहिमेत आतापर्यंत १० जणांचे मृतदेह सापडले

 

मुंबई (वृत्तसंस्था) : अमरावती जिल्ह्याच्या वरुड तालुक्यात श्री क्षेत्र झुंज इथं वर्धा नदीत नाव उलटून अकरा जण पाण्यात बुडाले होते,  त्यापैकी दहाजणांचे मृतदेह आता पर्यंत बचाव पथकाच्या हाती लागले आहेत. मंगळवारी तीन मृतदेह हाती लागले होते. इतरांचा शोध घेण्यासाठी बचाव पथक सातत्यानं कार्यरत असून काल दिवसभरात काहीही हाती लागलं नाही. त्यामुळे आज पुन्हा पहाटेपासून बचाव कार्य सुरू झालं. NDRF, SDRF आणि DDRF च्या पथकांनी ही शोधमोहिम राबवली आहे.