क्वाड देशांच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २४ तारखेला अमेरिकेला जाणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चार देशांच्या क्वाड परिषदेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे २४ सप्टेंबरला अमेरिकेला जाणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी या बैठकीचं आयोजन केलं आहे.या बैठकीत मोदी आणि बायडन यांच्यासह जपानचे प्रधानमंत्री योशिहीदे सुगा आणि ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री स्कॉट मॉरीसन हे देखील प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत.कोरोना स्थितीचा आढावा, पर्यावरण बदलाची समस्या, भारत-प्रशांत क्षेत्रात मुक्त आणि खुल्या वातावरणासाठी प्रोत्साहन, तसंच तंत्रज्ञान आणि सायबर स्पेस या मुद्द्यांवर क्वाड परिषदेत चर्चा होणार आहे.या वर्षी मार्च महिन्यात दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून क्वाड देशांची बैठक झाली होती. या बैठकीत ठरलेल्या मुद्द्यांच्या अंमलबजावणीचाही आढावा येत्या बैठकीत घेतला जाणार आहे.

Popular posts
कोल्हापुरातल्या गावित भगिनींच्या फाशीच्या शिक्षेचं जन्मठेपेत रुपांतर करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image