महाराष्ट्रासह ३ राज्यांमध्ये ६ अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे उद्घाटन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री पशुपती पारस यांनी काल महाराष्ट्र, उत्तराखंड आणि हरियाणातल्या ६ अन्नप्रक्रिया उद्योग प्रकल्पांचे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन केलं. एकंदर ७६ कोटी ७६ लाख रुपयांच्या या प्रकल्पांसाठी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयानं २४ कोटी रुपयांचं अनुदान दिलं आहे. या प्रकल्पांच्या माध्यमातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे दोन हजारांहून अधिक लोकांना रोजगार मिळणार असून परिसरातल्या ६ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. या प्रकल्पांमुळं महाराष्ट्र, उत्तराखंड आणि हरियाणातल्या अन्न प्रक्रिया उद्योगाला बळ मिळणार असून राज्यांना अतिरिक्त गुंतवणुकीची संधीही मिळणार असल्याचं पशुपती पारस यांनी यावेळी सांगितलं. आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालय ६ ते १२ सप्टेंबर या काळात अन्न प्रक्रिया सप्ताह साजरा करत आहे.