विद्यापीठांमधल्या रिक्त जागांवर ऑक्टोबरपर्यंत भरती करण्याची प्रक्रिया वेगानं व्हावी - धर्मेंद्र प्रधान

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विद्यापीठांमधल्या सहा हजार रिक्त जागांवर ऑक्टोबरपर्यंत भरती करण्यासाठी वेगानं प्रक्रिया करण्याचे आदेश केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय विद्यापीठांना दिले आहेत. प्रधान यांनी केंद्रीय विद्यापीठांच्या कुलगुरूंशी दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला.

भविष्यात भारताला जगात महत्वाचं स्थान मिळवून देण्यात नव्या शिक्षण धोरणाचा मोठा वाटा असेल. या धोरणाच्या मदतीनं विद्यापीठांनी भारताला ज्ञानाच्या क्षेत्रातली महाशक्ती बनवण्याचा प्रयत्न करावा, असं आवाहन प्रधान यांनी कुलगुरूंना केलं.

भारतीय भाषांमधून शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिलं जावं, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.