राज्यात आतापर्यंत ६३ लाख १७ हजार ७० रुग्ण कोरोनामुक्त

 

मुंबई (वृत्तसंस्था) :राज्यात काल ४ हजार ३६४  रुग्ण बरे होऊन घरी गेले, ३ हजार ७८३ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ५६ रुग्णांचा मृत्यू झाला.

राज्यात आतापर्यंत एकूण ६५ लाख ७ हजार ९३० जणांना कोरोनाची लागण झाली.‌ त्यापैकी आतापर्यंत ६३ लाख १७ हजार ७० रुग्ण बरे झाले. तर, १ लाख ३८ हजार २७७ रुग्ण दगावले. सध्या राज्यात ४९ हजार ३४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ७ शतांश टक्के झालं आहे. तर, मृत्यूदर २ पूर्णांक १२ शतांश टक्के आहे.

मुंबईत काल ६०४ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुट्टी दिली. मुंबईत आतापर्यंत ७ लाख १३ हजार २७४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल ५१४ नवीन रुग्णांची नोंद झाली. मुंबईत  आतापर्यंत रुग्णांची संख्या  ७ लाख ३६ हजार २८४ झाली असून, मुंबईतला रुग्ण दुपटीचा कालावधी १ हजार २७७ दिवसांवर आलाय. सध्या ४ हजार ६०२ रुग्ण उपचार घेत आहेत. काल कोरोनामुळे ४ रुग्णांचा  मृत्यू झाला असून,  मृतांचा एकूण आकडा १६ हजार ३७ वर पोचला आहे. 

नांदेड जिल्ह्यात ८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. काल जिल्ह्यात ७ नव्या रुग्णांची नोंद झाली. सध्या ३३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

परभणी जिल्ह्यात ३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. काल २ नवीन रुग्ण आढळले. सध्या जिल्ह्यात ८ रुग्ण उपचार घेत आहेत.

वाशिम जिल्ह्यात काल बरा झालेल्या एका रुग्णाला घरी पाठवलं. काल जिल्ह्यात एकाही नव्या रुग्णाची नोंद नाही. सध्या ९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Popular posts
रमजान महिन्यात नमाजासाठी एकत्र जमण्याची परवानगी देता येणार नाही- उच्च न्यायालय
Image
तलिबान सत्तेत आल्यानंनतर अफगाणिस्तानमध्ये ६४००हून अधिक माध्यम प्रतिनिधींनी गमवली नोकरी
Image
राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत भावेश शेखावत यांनी २५ मिटर रॅपिड फायर पिस्तोल प्रकारात पटकावलं सुर्वण पदक
Image
भंडारा महिला अत्याचार प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
Image
येत्या सोमवारपासून ७१ अनारक्षित मेल आणि एक्स्प्रेस रेल्वेगाड्या सुरू करण्याचा रेल्वे मंत्रालयाचा निर्णय
Image