सणासुदीचे आगामी ३ महिने कोरोनासंबंधी काळजी घेणं अतिशय महत्वाचं – आरोग्य मंत्रालय

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सणासुदीच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सर्वांनी काळजी घेण्याचा सल्ला आरोग्य मंत्रालयानं दिला आहे. आगामी तीन महिने अत्यंत महत्त्वाचे असून या काळात कोरोना नियमांबाबत हलगर्जीपणा करून चालणार नाही असं आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी काल ट्वीटरवर आयोजित कोविड चर्चा या विशेष कार्यक्रमात सांगितलं. सण साजरे करताना कोरोना नियमांचा विसर पडू देऊ नका; नागरिक आणि सरकारच्या एकत्रित प्रयत्नांतूनच कोरोना विरुद्धची लढाई जिंकता येईल असं अग्रवाल म्हणाले.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image