अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी महाविद्यालयाकडे प्रथम येणाऱ्यास प्राधान्यानुसार प्रवेश- राज्य सरकार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरी सुरू करण्याची परवानगी राज्य सरकारनं दिली आहे. केवळ चालू शैक्षणिक वर्षासाठीच ही परवानगी देण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यातील मुंबई महानगर क्षेत्रातली महाविद्यालये, पुणे आणि पिंपरी चिंचवड, नाशिक, नागपूर आणि अमरावती महापालिका क्षेत्रातल्या यापुढच्या टप्प्यासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेऱ्यांचे आयोजन करता येईल. विशेष फेरीमुळे प्रवेश प्रक्रियेला विलंब होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे, असे राज्य सरकारने कळवले आहे.