धुळे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ३८ हजार ५५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

 

मुंबई (वृत्तसंस्था) : धुळे जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ३८ हजार ५५ हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाले असून, ४७ हजार २३० शेतकऱ्यांना फटका बसला आहे. खरीप हंगामामध्ये ९७ टक्के क्षेत्रावर म्हणजेच ३ लाख ९८ हजार ७२९ हेक्टरवर पेरणी झाली. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कपाशीला सर्वाधिक फटका बसला असून, अनेक पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला असल्याने उत्पादन घटण्याची शक्यता आहे.कृषी आणि महसूल विभागानं नुकसानाचे पंचनामे केले असून, नुकसानग्रस्त शेतकरी शासनाकडून मदत मिळण्याची प्रतीक्षा करत आहेत.