जबाबदार नागरिक घडवण्यासाठी शिक्षण संस्थांनी पुढाकार घ्यावा - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : जबाबदार नागरिक घडवण्यासाठी शिक्षण संस्थांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यात किन्हवली इथं विद्या प्रसारक मंडळाच्या विधी महाविद्यालयाचं उद्घाटन, पदव्युत्तर शाखेचा प्रारंभ आणि महाविद्यालयाच्या विस्तारीत इमारतीचा पायाभरणी समारंभ काल राज्यपालांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. समाजात लहानपणापासून विद्यार्थ्यांवर सदाचाराचे आणि शिष्टाचाराचे संस्कार झाले पाहिजे. चांगलं चारित्र्य घडवण्यासाठी लहानपणापासून विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देणं आवश्यक आहे, असं ते म्हणाले. कोणत्याही क्षेत्रात सध्या मुलांपेक्षा मुलीच अग्रेसर असतात. सामाजिक कार्यातही महिलांना मोठया संख्येनं सहभागी करुन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असं. राज्यपालांनी सांगितलं. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार दौलत दरोडा, माजी आमदार गोटीराम पवार, पांडूरंग बरोरा, व्हीपीएम संस्थेचे अध्यक्ष अरविंद भानुशाली आदी यावेळी होते. केंद्रीय पंचायत राज विभागाच्या माध्यमातून देशातल्या २ लाख ५५ हजार ग्रामपंचायती अॅगपच्या माध्यमातून जोडल्या जात असून, प्रत्येक राज्यातल्या भाषेत हे अॅ प असणार असल्याचं कपील पाटील यांनी यावेळी सांगितलं. त्या माध्यमातून केंद्राच्या २३ योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न केला जात असून या उपक्रमांतर्गत ठाणे जिल्ह्यातल्या १० गावांची प्रायोगिक तत्वावर निवड केली असल्याचं त्यांनी सांगितलं.

Popular posts
रमजान महिन्यात नमाजासाठी एकत्र जमण्याची परवानगी देता येणार नाही- उच्च न्यायालय
Image
तलिबान सत्तेत आल्यानंनतर अफगाणिस्तानमध्ये ६४००हून अधिक माध्यम प्रतिनिधींनी गमवली नोकरी
Image
राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत भावेश शेखावत यांनी २५ मिटर रॅपिड फायर पिस्तोल प्रकारात पटकावलं सुर्वण पदक
Image
भंडारा महिला अत्याचार प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
Image
येत्या सोमवारपासून ७१ अनारक्षित मेल आणि एक्स्प्रेस रेल्वेगाड्या सुरू करण्याचा रेल्वे मंत्रालयाचा निर्णय
Image