देशात आतापर्यंत दिलेल्या लस मात्रांची संख्या ७१ कोटी ६५ लाखाच्या वर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत काल राज्यात एकाच दिवसात १५ लाखांपेक्षा अधिक लस मात्रा लाभार्थ्यांना देऊन विक्रम महाराष्ट्रानं नोंदवला आहे.  काल राज्यात एकूण ५ हजार २७१ लसीकरण सत्रांच्या माध्यमातून १५ लाख ३ हजार ९५९ नागरिकांचं लसीकरण केल्याचं आरोग्य विभागानं कळवलं आहे.

लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी आरोग्य यंत्रणा घेत असलेल्या परिश्रमांबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं आहे.

राज्यात या लसीकरण मोहिमेत आतापर्यंत दिलेल्या लशींच्या मात्रांची संख्या ६ कोटी ५५ लाख ८२ हजार ८७८  वर गेली आहे. तर, सुमारे  १ कोटी ८० लाख नागरिकांना लसीची दुसरी मात्रा देऊन याबाबतीत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. राज्यात १८ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकसंख्येपैकी कमीत कमी एक मात्रा दिलेल्या लोकांचं प्रमाण ४८ पूर्णांक ४६ शतांश टक्के आहे.

१८ ते ४४ वयोगटातल्या लोकसंख्येपैकी कमीत कमी एक मात्रा दिलेल्या लोकांचं प्रमाण ३७ पूर्णांक ८८ शतांश टक्के आहे. तर, ४५ पेक्षा अधिक वयाच्या कमीत कमी एक मात्रा दिलेल्या लोकांचं प्रमाण ५२ पूर्णांक २४ शतांश टक्के आहे.

 

 

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image