भारताच्या कोविड लसीकरणाने काल ८१ कोटींचा टप्पा ओलांडला

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या कोविड लसीकरणाने काल ८१ कोटींचा टप्पा ओलांडला. देशभरात आतापर्यंत ८१ कोटी ७३ लाख ९५ हजार ७६३ लसींच्या मात्र देऊन झाल्या आहेत. कालच्या एका दिवसात ८५ लाख ६८ हजार लसमात्रा दिल्या गेल्या.