गणवेशासाठी खादीचा वापर करण्याचं उपराष्ट्रपतींचं शैक्षणिक संस्थांना आवाहन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खादी आणि ग्रामोद्योग आयोग "आजादी का अमृत महोत्सव" या कार्यक्रमाअंतर्गत अमृत महोत्सव विथ खादी " या नावानं एक डिजिटल क्विज़ स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेचं उद्घाटन  उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांच्या हस्ते झालं. यावेळी बोलताना उपराष्ट्रपतींनी शैक्षणिक संस्थांना आवाहन केलं की, खादी हा राष्ट्रीय कापड असून त्याचा सर्व विद्यार्थ्यांनी गणवेश म्हणून वापर करावा.

ही स्पर्धा  १४ सप्टेंबर पर्यत सुरू राहील. दर दिवशी केवीआईसी च्या सगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्म वर ५ प्रश्न विचारले जातील. सहभागी होण्यासाठी https://www.kviconline.gov.in/kvicquiz/ या साइटवर जायचं आहे. कि्वज सकाळी  ११ वाजता सुरू होईल.

रात्री ११ पर्यंत उत्तरं पाठवता येतील. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त उत्तरं देणाऱ्यांना पुरस्कार दिले जातील. २१ विजेत्यांना एकूण ८० हजाराचे पुरस्कार दिले जातील. खादी इंडिया ई-कूपन विजेत्यांना केवीआईसी च्या ऑनलाइन पोर्टल www.khadiindia.gov.in वर पुरस्काराची  रक्कम दिली जाईल.