आंतरराष्ट्रीय प्रवास करुन राज्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांना आरटीपीसीआऱ चाचणी बंधनकारक

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय प्रवास करून राज्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी, केंद्र शासनाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागानं वेळोवेळी जारी केलेले आदेश राज्य शासनानं लागू केले आहेत. केंद्र शासनाच्या नियमांप्रमाणे, आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या व्यक्तीनं, लसीचे दोन्ही डोस घेतलेले असले तरी कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी करणं बंधनकारक आहे. हाच नियम राज्यातही लागू राहील, असन पत्रक राज्य शासनाच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे.