साखरेच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मागणी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : साखरेच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. सहकारी साखर उद्योगांच्या समस्यांबाबत पवार यांनी काल दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचं पत्रही शाह यांना सुपुर्द करण्यात आलं. सहकारी साखर उद्योग आर्थिक अडचणींचा सामना करत असल्याचं, या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. सहकारी साखर कारखान्यांच्या विद्यमान नियमावलीअंतर्गत कारखाना परिसरातच इथेनॉल उत्पादन केंद्र सुरु करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणीही शहा यांच्याकडे करण्यात आली.