टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत महिला मुष्टीयुद्धात भारताच्या लवलीना कास्य पदक

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची मुष्टीयोद्धा लवलीना बोरगोहेन हिनं कांस्य पदक पटकावलं आहे. आज झालेल्या उपान्त्य फेरीच्या सामन्यात लवलीनाला तुर्कीच्या सुरमेनेली बुसेनाझ हिच्याकडून शुन्य - पाच असा पराभव पत्करावा लागला. ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळवणारी ती तिसरी भारतीय मुष्टीयोद्धा ठरली आहे. लवलीनाच्या या यशाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद , उपराष्ट्रपती एम. वैकय्या नायडू , प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  क्रीडा आणि युवा कल्याणमंत्री  अनुराग ठाकूर ,राज्य ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केलं आहे. कुस्तीमध्ये भारताचा दिपक पुनिया उपांत्य आणि रवी दहिया यांनी अतिम फेरीत प्रवेश केला आहे. दीपकनं ८६ किलो वजनी गटात चीनच्या झुशेन लीन चा सहा - तीन असा पराभव केला. तर रवीनं फ्रिस्टाईल प्रकारात ५७ किलो वजनी गटात बल्गेरियाच्या जॉर्जी वांगेलोव्ह याचा पराभव केला. दोघांचेही उपान्त्य फेरीतले सामने आजच होणार आहेत. कुस्तीमध्ये महिलांच्या ५७ किलो वजनी गटात अंशु सिंगला बेलारुसच्या कुस्तीपटूकडून पराभव पत्करावा लागला. आज पहाटे झालेल्या भालाफेक स्पर्धेत भारताचा नीरज चोप्रा अंतिम फेरीत पोहोचला आहे. गोल्फमध्ये महिलांच्या एकेरी प्रकारात भारताच्या दीक्षा डागर आणि अदिती अशोक पहिली फेरी खेळत आहेत. महिला हॉकी संघाचा उपांत्यफेरीचा सामना आज अर्जेंटिना संघासोबत होणार आहे. 

Popular posts
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कार्यक्षेत्रात स्वच्छ महाराष्ट्र अभियान - निबंध, चित्रकला, घोषवाक्य स्पर्धा
Image
जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून मुंबई आणि महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन
Image
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कृतज्ञतापूर्वक वंदन
Image
राज्यातील कामगारांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती - कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती
Image
भारतानं सादर केलेल्या अजेंड्याला सदस्य देशांची प्राथमिक पातळीवर सहमती
Image