देशातला रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ३९ शतांश टक्क्यावर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं ५० कोटी ६८ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या २४ तासात लसींच्या ५५ लाख ९१ हजार मात्रा देण्यात आल्या. काल दिवसभरात ४३ हजार ९१० रुग्ण बरे झाले. सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ३९ शतांश टक्के आहे. आतापर्यंत देशात ३ कोटी १० लाख ९९ हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले. गेल्या चोवीस तासात देशात ३९ हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर ४९१ जणांचा मृत्यू झाला. सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ४ लाख ६ हजार ८२२ इतकी आहे. देशानं चाचणी क्षमतेत सातत्यानं वाढ केली असून आतापर्यंत ४८ कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत.