राज्यात बरे झालेल्या रुग्णांपेक्षा नव्याने आढळलेल्या रुग्णांची संख्या जास्त

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल बरे झालेल्या रुग्णांपेक्षा नव्यानं आढळलेल्या रुग्णांची संख्या जास्त होती. त्यामुळे कोरोनामुक्तीचा दर किंचित घसरला, तर मृत्यूदर किंचित वाढला आहे. काल राज्यभरात ५ हजार ३१  नवे रुग्ण आढळले, ४ हजार ३८० रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर २१६ रुग्णांचा मृत्यू झाला.राज्यात आतापर्यंत एकूण ६४ लाख ३७ हजार ६८० जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ६२ लाख ४७ हजार ४१४ रुग्ण बरे झाले. तर १ लाख ३६ हजार ५७१ रुग्ण दगावले. सध्या राज्यात ५० हजार १८३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ४ शतांश टक्के झालं आहे. तर, मृत्यूदर २ पूर्णांक १२ शतांश टक्के आहे.