अफगाणिस्तानबाबत भारताच्या धोरणावर सर्वपक्षीय नेत्यांना केंद्राद्वारे संबोधन
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराष्ट्र व्यवहारमंत्रीडॉक्टर एस. जयशंकर अफगाणिस्तानमधील परिस्थितीबाबत सर्वपक्षीय नेत्यांना आत्ता माहिती देत आहेत. संसदेच्या संकुल उपभवनात हा वार्तालाप सुरु आहे. अफगाणिस्तानमधील एकंदर अस्थिर परिस्थिती लक्षात घेऊन त्याबाबतची माहिती सर्व पक्षांच्या नेत्यांना द्यावी, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार हा वार्तालाप आयोजित करण्यात आल्याचं जयशंकर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
आत्तापर्यंत आठशेहून अधिक भारतीयांना मायदेशी परत आणण्यात आलं आहे, किती जणांना आणणं बाकी आहे याचबरोबर भारताचं अशांत अफगाणिस्तानबाबतचं धोरण काय आहे याविषयी जयशंकर यांनी बैठकीत माहिती दिल्याचं आकाशवाणीच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, कॉंग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे, अधीररंजन चौधरी, तृणमूल कॉंग्रेसचे सौगत रोय, डीएम के चे टी, आर. बालू, प्रसन्न आचार्य आदी नेते त्यासाठी उपस्थित आहेत.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, पियुष गोयल ,मीनाक्षी लेखी, अर्जुन राम मेघवाल परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रुन्गाला हे ही बैठकीस उपस्थित आहेत. भारत जगातील अनेक देशांच्या संपर्कात असून अफगाणिस्तानमधील स्थितीबाबत त्यांच्याशी चर्चा करत आहे, असंही जयशंकर यांनी म्हटलं आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.