सन २०१७-१८ आणि २०१८-१९ वर्षांसाठीचे राष्ट्रीय युवा क्रीडा पुरस्कार प्रदान

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज देशात विविध क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन होत असून आत्मनिर्भर नवाचाराचं / नवोन्मेषाचं नवं युग सुरु झालं आहे. अशावेळी देशातील युवाशक्ती हीच देशाचा वर्तमान आणि भविष्य असून युवकांना राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात सामील करून घेणं हाच या पुरस्कारांचा हेतू आहे, असं केंद्रीय क्रीडामंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय युवा क्रीडा पुरस्कार वितरण कार्यक्रम आज सकाळी नवी दिल्ली इथं विज्ञान भवनात ठाकूर यांच्या हस्ते पार पडला. त्यामध्ये ते बोलत होते. सन २०१७-१८ आणि २०१८-१९ वर्षांसाठीचे पुरस्कार ठाकूर यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. गुणाजी मांजरेकर, हिमांशूकुमार गुप्त, प्रदीपकुमार, नेहा कुशवाह, चेतन बहाद्दूर, रणजितसिंग, मोहम्मद आझम, सिद्धार्थ राय यांना व्यक्तिगत कामगिरीसाठी तर गुजरातच्या युवा दिशा केंद्राला संस्थात्मक कामगिरीसाठी पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.