रुपी बँकेतील ठेवीदारांना त्यांचे मुदत ठेवीचे पैसे लवकरच परत मिळतील - निर्मला सीतारामन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रुपी बँकेतील ठेवीदारांना त्यांचे मुदत ठेवीचे पैसे लवकरच परत मिळतील अशी ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी लोकसभेत दिली. डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ॲक्ट' हे विधेयक सोमवारी लोकसभेत मंजूर झालं. त्यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देतांना सीतारामन यांनी रुपी बँकेसारख्या लहान बँकातील पाच लाखापर्यंतच्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवींचे पैसे नव्वद दिवसात परत मिळतील असं आश्वासन दिलं असल्याचं खासदार गिरीश बापट यांनी काल नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलताना सांगितले. प्रशासकीय अधिकाऱ्यांशी येत्या दोनतीन दिवसात चर्चा करून रुपी बँकेच्या विलीनीकरणाचा प्रश्नही मार्गी लावण्याचा आपण प्रयत्न करू. असं आश्वासनही सीतारामन यांनी आपल्याला दिल्याचं बापट यांनी सांगितलं.

Popular posts
कोल्हापुरातल्या गावित भगिनींच्या फाशीच्या शिक्षेचं जन्मठेपेत रुपांतर करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून दाऊद टोळीतल्या दोघांना अटक
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image