टोकियो ऑलिम्पिक पदकविजेत्या खेळाडूंचा आज भारतीय क्रीडा प्रधिकरणाच्या वतीनं सत्कार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजधानी टोकियो इथं पार पडलेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतल्या भारताच्या पदकविजेच्या खेळाडूंचा आज भारतीय क्रीडा प्रधिकरणाच्या वतीनं सत्कार केला जाणार आहे. नवी दिल्ली इथल्या मेजर ध्यानचंद क्रीडा संकुलात आज संध्याकाळी हा सत्कार सोहळा होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरवरून ऑलिम्पिकमधल्या भारताच्या पदक विजेत्यांसह संपूर्ण चमूचं अभिनंदन केलं आहे. या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलेला प्रत्येक खेळाडू हा विजेताच आहे असं त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. अधिकाधिक खेळाडूंना देशाचं प्रतिनिधीत्व करायची संधी मिळवून देण्याच्यादृष्टीनं विविध खेळांचा तळागाळापर्यंत प्रचार प्रसार करायची हीच योग्य वेळ असल्याचंही त्यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.