राज्यात कोरोना विषाणूच्या डेल्टा प्लस प्रकाराचा संसर्ग झालेले आणखी २७ रुग्ण

 

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात आणखी २७ जणांना डेल्टा प्लस या कोरोनाच्या नव्या स्वरुपाची लागण झाली होती असं काल स्पष्ट झालं. आत्तापर्यत राज्यभरातल्या कोविड बाधितांपैकी १०३ जणांना डेल्टा प्लस या नव्या स्वरुपाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.दरम्यान मुंबईतल्या कोविड बाधितांपैकी १८८ जणांच्या नमुन्यांचं पहिल्या टप्प्यातलं जिनोम सिक्वेन्सिंग पूर्ण झाल्यानंतर, त्याबाबतचा अहवाल काल मुंबई महानगरपालिकेनं जाहीर केला.

या अहवालानुसार या १८८ नमुन्यांपैकी १२८ जणांमध्ये डेल्टा प्लस या स्वरुपाची बाधा झाल्याचं आढळलं, तर २४ जणांमध्ये कप्पा, तर दोन जणांमध्ये अल्फा हे स्वरुप आढळलं. उर्वरित इतर नमुने कोविडच्या सर्वसाधारण स्वरुपाचे होते असं पालिकेनं कळवलं आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक सर्व नियमांचं पालन करावं, असं आवाहन पालिकेनं केलं आहे.