देशाचा कोरोनारुग्ण बरे होण्याचा दर आता ९७ पूर्णांक ४८ शतांश टक्क्यांवर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ प्रतिबंधक लसीकरणाच्या राष्ट्रव्यापी मोहिमेत आतापर्यंत ५४ कोटी ५८ लाख मात्रा देऊन झाल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं की गेल्या २४ तासात १७ लाख ४३ हजार मात्रा टोचण्यात आल्या. देशाचा कोरोनारुग्ण बरे होण्याचा दर आता ९७ पूर्णांक ४८ शतांश टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या २४ तासात सुमारे ३६ हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ३ कोटी १४ लाखापेक्षा जास्त आहे. काल दिवसभरात कोरोना संसर्ग झालेले ३२ हजार ९३७ नवे रुग्ण आढळले तर ४१७ रुग्णांचा मृत्यू झाला. कोविड चाचण्यांचा वेग वाढवण्यात आला असून काल दिवसभरात सुमारे १२ लाख नमुने तपासण्यात आले.