प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक वासू परांजपे यांचं निधन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक आणि मुंबई चे माजी रणजीपटू वासुदेव जगन्नाथ परांजपे उर्फ वासू परांजपे यांचं काल मुंबईत माटुंगा इथं त्यांच्या निवासस्थानी निधन झालं. पार्किन्सन्सच्या विकारानं आजारी असलेले परांजपे 82 वर्षांचे होते. दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत काल रात्री त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडूलकर, संजय मांजरेकर यांच्यासारख्या महान भारतीय क्रिकेटपटूंना त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं होतं. राहुल द्रविड, सौरव गांगुली, रोहित शर्मा यांनासुद्धा त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळाला होता. देशाचे क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी परांजपे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.