प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आत्मनिर्भर भारताचं स्वप्न विदेशी भारतीय युवकांनी उच्च महत्वाकांक्षा ठेवल्यास सहज शक्य असल्याचं युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर यांचं प्रतिपादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विदेशातल्या युवकांनी खऱ्या मनानं आपल्या उच्च महत्वाकांक्षा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्न केल्यास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकारण्याच्या कार्यक्रमात गती येईल, असं मत युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर यांनी व्यक्त केलं आहे. ते आज २२ व्या राष्ट्रीय युवा पुरस्कार प्रदान सोहळ्यात बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते युवक तसचं राष्ट्रीय विकास आणि समाजसेवी संघटनांना पुरस्कार देण्यात आले. अनुराग ठाकुर यांनी २०१७-१८ या वर्षासाठी १४ तर १८-१९ साठी आठ पुरस्कार प्रदान केले.