१२७ वी घटना दुरुस्ती विधेयक सामाजिक सक्षमीकरणासाठी अत्यंत महत्त्वाचं - प्रधानमंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १२७ वी घटना दुरुस्ती विधेयकाला दोन्ही सभागृहात मंजूर झालं हा देशासाठी खूप महत्त्वाचा टप्पा आहे, अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. सामाजिक सक्षमीकरणासाठी हे विधेयक अत्यंत महत्त्वाचं आहे. समाजातील वंचित घटकांना न्याय, संधी आणि सन्मान मिळण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे त्याचंच हे प्रतिबिंब आहे, असंही त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे.