स्वातंत्र्यदिनापासून मुंबईत लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांना लोकलने प्रवास करता येणार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्यदिनापासून मुंबईत लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांना लोकलने प्रवास करता येणार आहे. यासाठी मुंबई महानगरपालिकेनं पूर्ण तयारी केली असून मुंबईतल्या ५३ स्थानकांवर ३५८ मदत केंद्रे उभारण्यात आली आहेत. पहिल्या सत्रात १८ हजार ३२४ नागरिकांचं पडताळणी पूर्ण झाली असून १७ हजार ७५८ जणांना मासिक पास देण्यात आले आहेत. महापौर किशोरी पेडणेकर आणि अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी आज पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवर जाऊन या मदतकेंद्रांचा आढावा घेतला. कोविड लसीची दुसरी मात्रा घेतल्यानंतर १४ दिवसांनी या प्रवासासाठी पात्र होता येणार आहे.