शेतकऱ्यांची शेतमालकी कायम राखण्यासाठी ''कम्युनिटी नेचर कन्झरवंसी'' या उपक्रमाअंतर्गत ताडोबा फाउंडेशन आणि शेतकऱ्यांमध्ये करार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : ताडोबा-अंधारी इथल्या व्याघ्र प्रकल्पाच्या अतिरिक्त क्षेत्रात, खाजगी शेतमालकांच्या जमिनीवर शेतीची जमीनमालकी कायम ठेवून, वन्यजीव व्यवस्थापन उपक्रम राबवले जाणार आहेत. देशातल्या व्याघ्र संवर्धन आणि वन्यजीव व्यवस्थापनासाठीचा ''कम्युनिटी नेचर कन्झरवंसी'' या उपक्रमाअंतर्गत हा अभिनव प्रयोग राबवला जाणार आहे. यासाठी ताडोबा फाउंडेशन आणि शेतकऱ्यांमध्ये एक संयुक्त करारही केला गेला आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी प्रतिएकर ५ हजार रुपये इतका मोबदला दिला जाणार आहे. अशाप्रकारचा हा पहिलाच करार असून २२ शेतकऱ्यांच्या एकूण १०४ एकर जमिनींबाबत हा करार असून, अशाप्रकारचा हा पहिलाच करार आहे. या कराराअंतर्गतच्या जमीनींवर शेतकऱ्यांनी उत्पन्न न घेता वन्यजीवांच्या मुक्त संचारासाठी मदत करायची अट लागू असेल.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image