देशात जॉन्सन अँण्ड जॉन्सनच्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या एका मात्रेच्या आपत्कालीन वापरासाठी केंद्र सरकारची मंजुरी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात जॉन्सन अँण्ड जॉन्सन कंपनीनं तयार केलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या एकल मात्रेच्या आपत्कालीन वापरासाठी केंद्र सरकारनं आज मंजुरी दिली. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली. यामुळे कोरोनाविरोधातल्या सामुहिक लढाईला बळ मिळेल, असं त्यांनी म्हटलं आहे.