सर्वच विद्यार्थ्यांसाठी दूरदर्शनवर स्वतंत्र शिक्षण वाहिनी का नाही? - मुंबई उच्च न्यायालय

 

मुंबई (वृत्तसंस्था) : करोना संकट काळात फक्त दिव्यांग, विशेष विद्यार्थ्यांसाठी नव्हे तर सर्वच विद्यार्थ्यांसाठी दूरदर्शनवर स्वतंत्र शिक्षण वाहिनी का नाही? अशी विचारणा आज मुंबई उच्च न्यायालयानं केली आहे. सिनेमांच्या शेकडो वाहिन्या असतांना शिक्षणासाठी एखादी २४ तास चालणारी वाहिनी का नाही? असंही न्यायालयानं विचारलं आहे. नॅब आणि अनाम प्रेम या दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयानं ही विचारणा केली आहे. लोकसभा आणि राज्यसभाच्या कामकाजांविषयी स्वतंत्र दूरचित्रवाहिनी आहे, तशीच  शिक्षणासाठीही असायला हवी. याचा  केंद्र आणि  राज्य सरकारांनी  विचार करावा अशी सूचना करत मोबाईल नेटवर्क न मिळण्याची समस्या ही कायमच राहणारी असून  राज्यातील सर्वच दिव्यांग विद्यार्थ्यांपर्यंत दूरदर्शन, आकाशवाणीच्या माध्यमातून शिक्षण पोचवण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावा. त्याबाबत माहिती आणि प्रसारण  मंत्रालयाशी चर्चा करून गुरुवारी भूमिका स्पष्ट करावी. अशी सूचनाही  मुंबई उच्च न्यायालयानं  राज्य सरकारला केली आहे.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image