जालना इथं ३६५ खाटांचं मनोरुग्णालय उभ राहनार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : जालना इथं ३६५ खाटांचं प्रादेशिक मनोरुग्णालय उभारण्यास काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या मनोरुग्णालयामुळे मराठवाडा तसंच विदर्भातल्या रुग्णांसाठी आंतररुग्ण उपचार तसंच पुनर्वसनासाठी उपचारांची सुविधा उपलब्ध होणार आहे. मनोरुग्णालय उभारण्यासाठी इमारत बांधकाम, यंत्रसामुग्री, रुग्णवाहिका, औषधी, उपकरणं तसंच मनुष्यबळ, यासाठी १०४ कोटी ४४ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. राज्यातल्या कृषी विद्यापीठांमधल्या शिक्षकवर्गीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासही, काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. राज्यातील कृषी विद्यापीठं, संलग्न कृषी महाविद्यालयं यामधील शिक्षकवर्गीय कर्मचाऱ्यांना, विद्यापीठ अनुदान आयोगाची सुधारित वेतन संरचना, एक जानेवारी २०१६ पासून लागू करायला मंत्रिमंडळानं मान्यता दिली.