एस जयशंकर यांनी ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डोमिनीक राब यांची भेट घेतली

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर यांनी काल ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डोमिनीक राब यांची भेट घेतली. अफगाणिस्तानमधील सद्यस्थिती आणि आव्हाने याबाबत यावेळी चर्चा झाली. अशी माहिती जयशंकर यांनी ट्विटर संदेशांत दिली आहे. जयशंकर सध्या चार दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतर्फे आयोजित तंत्रज्ञान आणि शांतता या विषयावरील खुल्या चर्चासत्राचं ते अध्यक्षस्थान भूषवत आहेत. शांतता राखण्यासाठी बलिदान दिलेल्या वीरांच्या स्मरणार्थ संयुक्त राष्ट्रानं उभारलेल्या स्मारकावर संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनिओ गुटेरेस, इस्टोनियाच्या परराष्ट्र मंत्री एव्हा मारिया लिमेटस आणि एस. जयशंकर यांनी आदरांजली अर्पण केली.