एकनाथ खडसे यांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाद्वारे जप्त

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयानं जप्त केली आहे. भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी घोटाळा प्रकरणात खडसे यांची लोणावळा आणि जळगाव इथली सुमारे ५ कोटी ७३ लाख रुपयांची मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे.