तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत विकासकामांना दिला जाणारा निधी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत विकासकामांना दिला जाणारा निधी तांडा वस्तीच्या लोकसंख्येनुसार दिला जाणार आहे.इतर मागास बहुजन कल्याण विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली. बंजारा समाजाची लोकसंख्या जास्त आहे अशा ११ बंजाराबहुल जिल्ह्यांमध्ये बंजारा समाजातल्या व्यक्तींच्या अध्यक्षतेखाली अशासकीय समिती स्थापन केली जाणार असून तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत संतश्रेष्ठ रामराव महाराज सभागृह या नावानं नवीन कामाचा समावेश केला आहे. या सभागृह बांधकामासाठी तांडा वस्तीच्या लोकसंख्येवर आधारित निधी दिला जाईल, असं त्यांनी सांगितलं.