देशात शनिवारी ३९ हजार २५८ रुग्ण कोरोनामुक्त

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात गेल्या चोवीस तासात ३९ हजार २५८ रुग्ण कोरोनामुक्त झाले,तर ४१ हजार ८३१ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली. या कालावधीत कोविड-१९ मुळे ५४१ मृत्युंची नोंद झाली. देशात सध्या ४ लाख १० हजार ९५२ कोरोना रुग्ण उपचाराधीन आहेत.

देशात बरे झालेल्या रुग्णांचं प्रमाण ९७ पूर्णांक ३६ शतांश टक्के आहे. कोविड प्रतिबंधक लसीकरणामध्ये देशानं ४७ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला आहे. काल दिवसभरात ६० लाख १५ हजारांहून अधिक लाभार्थ्यांना लसींच्या मात्रा देण्यात आल्या.