राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली विरोधकांची बैठक पार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज विरोधकांची चहापान बैठकही राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षा सुप्रिया सुळे, व शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि डीएमके पक्षाच्या कनिमोळी आदी नेते उपस्थित होते. देशाची सुरक्षितता आणि शेतकऱ्यांच्या भल्यासाठी विरोधक त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या बैठकीनंतर सांगितले. या बैठकीनंतर इंधनदरवाढीचा निषेध करण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी सायकल चालवत अधिवेशनासाठी संसदेत गेले.