राज्यात ५ हजार २२५ नवे कोविड रुग्ण

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल पाच हजार २२५ नवे कोविड रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६४ लाख ११ हजार ५७० झाली आहे. काल १५४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३५ हजार ५६७ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक ११ शतांश टक्के झाला आहे. काल ५ हजार ५७९ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६२ लाख १४ हजार ९२१ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९६ पूर्णांक ९३ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात ५५ हजार ५७९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.