प्रधानमंत्री आज संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेच्या उच्चस्तरीय खुल्या चर्चेचं अध्यक्षस्थान भूषवणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेच्या उच्चस्तरीय खुल्या चर्चेचं अध्यक्षस्थान भूषवतील. ही चर्चा आज संध्याकाळी होणार आहे. सागरी सुरक्षेत वाढ करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याचं महत्व हा या चर्चेचा विषय आहे. या चर्चेत सागरीक्षेत्रातले गुन्हे असुरक्षितता, सागरी सुरक्षेच्यादृष्टीनं समन्वयविषयक सक्षमीकरण या मुद्यांवर भर दिला जाईल. सुरक्षा परिषदेच्या अनेक सदस्य देशांचे प्रमुख आणि प्रतिनिधी या चर्चेत सहभागी होणार आहेत. ही चर्चा दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे.