राज्यात आतापर्यंत ६४ लाख ५६ हजार ९३९ जणांना कोरोनाची लागण

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आतापर्यंत एकूण ६४ लाख ५६ हजार ९३९ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ६२ लाख ६३ हजार ४१६ रुग्ण बरे झाले. तर, १ लाख ३७ हजार १५७ रुग्ण दगावले. सध्या राज्यात ५२ हजार ८४४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ टक्के झालं आहे. तर, मृत्यूदर २ पूर्णांक १२ शतांश टक्के आहे. मुंबईत काल २८० रुग्ण कोरोनामुक्त झाले, ३४५ नवे कोरोनाबाधित आढळले, तर २ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आत्तापर्यंत मुंबईतल्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख ४३ हजार ४९८ झाली आहे, त्यापैकी ७ लाख २२ हजार ३९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर १५ हजार ९७४ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतला कोरोना मुक्तीदर ९७ टक्क्यावर स्थीर आहे. गेले काही दिवस बऱ्या होणाऱ्या रुग्णांपेक्षा दैनंदिन बाधितांची संख्या जास्त असल्यानं, मुंबईतला रुग्णदुपट्टीचा कालावधी १ हजार ६११ दिवसांवर खाली आला आहे.